Breaking News

माणिकदौडी पंजाब नॅशनल बँक लुटण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला !


माणिकदौडी पंजाब नॅशनल बँक लुटण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला !
--------------
पंचायत समिती सदस्य सुनील ओहळ यांची माणिकदौडी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी
पाथर्डी प्रतिनिधी :
     तालुक्यातील माणिकदौडी येथील पंजाब नॅशनल बँकेमध्ये अज्ञात चोरट्यानी चोरीचा केलेला प्रयत्न फसला असुन यामध्ये बँकेतील सीसीटीव्हीचा इलसीडी व टीव्हीआर सोडून कुठल्याही प्रकारचा ऐवज गेला नसल्याची माहिती पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी दिली आहे.
          याबाबत अधिक माहिती अशी की,माणिकदौडी येथील पंजाब नॅशनल बँकेचे शटरचे कुलूप तोडून चोरी केल्याचा प्रयत्न झाला आहे तसेच शेजारी असलेल्या ए टी एम मशीनचे ही शटर कुलूप तोडले होते.
     सदरची घटना पहाटेच्या वेळी ग्रामस्थांच्या लक्ष्यात आली होती. त्यानंतर सदर चोरीबाबत पाथर्डी पोलीसाना माहिती देण्यात आली होती.घटनास्थळी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी,पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे,सहायक पोलिस निरीक्षक परमेश्वर जावळे,त्या बिटचे हवालदार रेवणनाथ राजने आदींनी धाव घेतली होती.तसेच श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.
      कोठेवाडी प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकार दरबारी माणिकदौडी येथे पोलीस चौकी सुरू करण्यात यावी याचा प्रस्ताव देण्यात आला होता.परंतु अद्यापपर्यत त्याची पूर्तता झाली नाही.तरी लवकरात लवकर याठिकाणी पोलीस चौकी करण्यात यावी अशी मागणी सदरील चोरीच्या घटनेनंतर पंचायत समिती सदस्य सुनील ओहळ यांनी केली आहे.