Breaking News

’लेट द गेम बिगिन’ : मोदींचा नवा मंत्र

Google search results: 'Feku' leads to Narendra Modi; 'Pappu' leads to  Rahul Gandhi - The Financial Express

प्रत्येक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करायचे आहे- मोदी

नवी दिल्ली/ प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 68व्या मन की बातमधून जनतेशी संवाद साधला. देशभरात यंदा इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा होतोय. उत्सव आणि पर्यावरणाचे दृढ नाते आहे. निसर्ग संवर्धनासाठी उत्सवाचे आयोजन केले जात असल्याचे मोदींनी सांगितले. कोरोनाच्या कठीण काळातही शेतकर्‍यांनी मोठे योगदान दिले असून, अन्नदाता शेतकर्‍यांना मोदींकडून मन की बातच्या सुरुवातीला नमन करण्यात आले.

पंतप्रधान मोदींनी यावेळी मन की बातमध्ये बोलताना खेळण्यांच्या उद्योगावर भर देण्याचे आवाहन केले. कोरोना काळात मुले वेळ कसा घालवत असतील? त्यांच्या भवितव्याबाबत मंथन केले असल्याचे मोदी म्हणाले. जगभरात खेळण्यांची मोठी बाजारपेठ आहे. मात्र, खेळण्यांच्या या ग्लोबल इंडस्ट्रीत भारताचे योगदान अतिशय कमी असल्याचे मोदी म्हणाले. भारत आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत पुढे जात असून, भारतातील मुलांना भारतातच तयार केलेली नवीन खेळणी कशी मिळतील यावर विचार सुरु आहे, असेही मोदींनी सांगितले. खेळण्यांची 7 लाख कोटींची मोठी बाजारपेठ आहे. टॉय इंडस्ट्री अतिशय व्यापक आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीत भारताला पुढे जाण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे. लोकल खेळणी वोकल करण्याचा प्रयत्न करुया. पर्यावरणालाही अनुकूल असतील अशी खेळणी तयार करावीत, खेळण्यांसह, मोबाईल, कॉम्प्युटर गेम्ससही भारतीय असावेत, असेही मोदी म्हणाले. भारतीयांची इनोव्हेशनची क्षमता जगभरात लोकप्रिय आहे. भारतीयांच्या याच इनोव्हेशच्या जोरावर ’लेट द गेम बिगिन’चा नवा मंत्र मोदींनी दिला आहे. स्टेप्स सेट गो, चिंगारी यांसारख्या काही भारतीय ऍप्सचं मोदींनी कौतुक केले असून, भारतीय ऍप्स वापरण्याचे आवाहनही केले आहे. नेशन आणि न्यूट्रीशनचा मोठा संबंध असल्याचे मोदींनी सांगितले. जसे पोषक अन्न असते तसाच आपला चांगला मानसिक विकास होतो. मुलांच्या पोषणाप्रमाणेच आईलाही तितकंच पोषण मिळणे गरजेचे आहे. मुले, मातांच्या पोषणाकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन मोदींनी केले. सप्टेंबरमध्ये पोषण महिना साजरा करणार असून, ज्या भागात जे उत्तम पिकते, त्यानुसार भारतीय कृषी कोश तयार केला जात, असल्याची माहितीही मोदींनी दिली.

--

मोदींच्या ’मन की बात’वर राहुल गांधींची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’मन की बात’ कार्यक्रमावर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी खोचकपणे निशाणा साधला. राहुल यांनी म्हटले की, सध्याच्या घडीला देशातील जेईई-नीटचे परीक्षार्थी पंतप्रधान मोदी काय बोलतात, याकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांना ’परीक्षा पे चर्चा’ हवी आहे. मात्र, पंतप्रधानांनी ’खिलोनो पे चर्चा’ केली, अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी केली.