Breaking News

देवळाली प्रवरात ४९ व्यक्तींच्या रँपीडस्टेस्ट, पाच व्यक्ती कोरोना बाधीत !

देवळाली प्रवरात 49 व्यक्तींच्या रँपीडस्टेस्ट, पाच व्यक्ती कोरोना बाधीत !
देवळाली प्रवरा प्रतिनिधी 
                  देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील राहुरी कारखाना येथील तीन व्यक्ती तर देवळाली प्रवरा येथील दोन व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे शनिवारी घेण्यात आलेल्या ४९ व्यक्तींच्या  रँपीडस्टेस्ट घेण्यात आल्या यामध्ये पाच व्यक्ती कोराना बाधीत आढळल्या.
            देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीत गेल्या तीन दिवसा पासुन  कोरोना बाधीत आढळले आहेत.आज पर्यंत एकुण २३ रुग्ण कोरोना बाधीत आढळले आहेत.१० रुग्णांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले.  पशु वैद्यकीय क्षेत्रातील एकावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात  उपचार सुरू असताना मृत्यू झाला.गुरवारी देवळाली प्रवरा येथील एका वस्तीवरील राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या पिता- पुत्रांसह त्यांच्या घरातील दोन महिला  कोरोना बाधीत आढळल्या  नंतर  शुक्रवारी एका रुग्णालयातील  परीचारीका व त्या रुग्णालयाच्या डाँक्टरच्या घरातील वयोवृद्ध पुरुष, राहुरी कारखाना येथील वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी असे तिघे कोरोना बाधीत आढळले आहेत. 
                    राजकीय क्षेञातील व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती कोरोना बाधीत  आढळल्याने त्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आण्णासाहेब मासाळ व मुख्याधिकारी अजित निकत  यांनी शोध घेवून ४९ व्यक्तींच्या रँपीडस्टेस्ट घेण्यात आल्या   त्यामध्ये पाच व्यक्ती बाधीत आढळले आहेत.
              शनिवारी रँपीडस्टेस्ट मध्ये आढळलेल्या पाच व्यक्ती मध्ये परीचारीकेच्या घरातील एक पुरुष व्यक्ती,  डाँक्टरच्या घरातील एक महिला व त्यांच्या जवळच्या नात्यातील एक महिला व दोन पुरुष  असे पाच व्यक्ती कोरोना बाधीत आढळले आहेत.रँपीडसटेस्ट करण्यासाठी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी नागरीकांना आवाहन करताना सांगितले नागरीकांनी न घाबरता संपर्कात आले आसल्यास स्ञाव देण्यासाठी पुढे यावे. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी  स्ञाव न देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांच्यावर दबाव आणू नये असे कदम यांनी सांगितले.