Breaking News

राहुरी तालुक्यात कोरोनाचा चौथा बळी, कात्रड येथील मृत्यु !

राहुरी तालुक्यात कोरूना चा चौथा बळी कात्रड येथील मृत्यु !
राहुरी शहर प्रतिनिधी :
राहुरी तालुक्यातील कोरोना चा  आज चौथा बळी गेला असून विळद घाट येथिल रुग्णालयात काल टेस्ट घेतलेल्या तालुक्यातील कात्रड येथील 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.  
     यापूर्वी देवळाली, राहुरी येथील तीन कोरोना बाधित रुग्णांचा कोरोना ने मृत्यू झाला असून गेल्या दीड महिन्यात राहुरी तालुक्यात १६२कोरोना बाधित रुग्ण झाले असून, त्यातील एकूण ८९ बरे झाले आहेत तर एकूण ६९ जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत कृषी विद्यापीठामध्ये २१  तर राहुरी फॅक्टरी येथील सेंटरमध्ये ते सहाजण कोरण टाईन केलेले आहेत. राहुरी तालुक्यात कोरोनाचा चौथा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे.
      गेल्या पाच दिवसांपासून ऑंटी जेन चाचण्यांमध्ये वाढ केल्याने रुग्णांचा आकडा काहीसा वाढलेला दिसत आहे ?  प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे .