Breaking News

कोपरगाव संदीप देवळलीकर यांच्या कडून मास्क वाटप करून आ काळे चा वाढदिवस साजरा!

कोपरगाव संदीप देवळलीकर यांच्या कडून मास्क वाटप करून आ काळे चा वाढदिवस साजरा!
करंजी प्रतिनिधी-
    ४ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ आशुतोष काळे यांचा वाढदिवस होता परंतु कोपरगाव तालुक्यावर वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता आ काळे नी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी कोणत्याही कार्यकर्त्यानी येऊ नये असे आव्हान केले होते.
      कोपरगांव तालुक्याचे आमदार  आशुतोष काळे यांच्या वाढदिवसा निमित्त तालुक्यातील त्यांचा वर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यानी विविध सामाजिक उपक्रम राबवत त्याचा वाढदिवस साजरा केला असून यात आज दि ६ ऑगस्ट रोजी कोपरगाव मधील प्रभाग क्रमांक ५ मध्ये  आमदार काळे यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप देवळालीकर यांच्या वतीने कोपरगाव शहरातील प्रभागात ३००० मास्क वाटप करण्यात आले.
     यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक मंदार पहाडे, हिरामण गंगूले, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, वाल्मिक लहिरे, रमेश गवळी, संदीप कपिले, निलेश डांगे, गणेश लकारे, धनंजय कहार, महेश उदावंत, करण दळवी, अमोल देवकर, सचिन खैरनार, शुभम भुजबळ, कैलास नागरे, प्रकाश भडकवाडे, अनिल उदावंत, तुषार चिकने, समर्थ दीक्षित, गौरव जंगम, बाळा देवकर, महेश आमले आदी उपस्थित होते.