Breaking News

तनपुरे कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर, विखे आता पाहुण्यांना देणार संधी !

तनपुरे कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर, विखे आता पाहुण्यांना देणार संधी !
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी :
          डॉ.तनपुरे  कारखाना चेअरमन  उदयसिंह पाटील व व्हा.चेअरमन शामराव निमसे यांनी सोमवारी सकाळी  संचालक मंडळाच्या बैठकीत  राजीनामे दिले.
       राहुरी कारखाना निवडणूकी नंतर चेअरमन पदी उदयसिंह पाटील तर व्हा.चेअरमन पदी शामराव निमसे  यांच्या निवडीवर माजी मंञी  राधाकृष्ण विखे पा., खा. सुजय विखे पा. यांनी शिक्का मोर्तब केला होता.  चार वर्ष कालावधीत त्यांनी पदभार सांभाळला.
        परंतू काही दिवसा पुर्वीच विखे यांनी यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. डाँ.तनपुरे कारखान्याच्या चेअरमनपदी विखे यांच्या  नातेवाईकांची वर्णी लावण्यासाठी   पाटील निमसे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले असल्याची चर्चा चालू आहे.उंबरे येथील सँचालकाची चेअरमन पदी वर्णी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.