Breaking News

पारनेर तालुक्यातील कारेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार !

पारनेर तालुक्यातील कारेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
------------
शेळीला वाचवायला गेलेल्या शेतकऱ्यावर ही बिबट्या धावला
पारनेर प्रतिनिधी - 
       पारनेर तालुक्यातील कारेगाव शिवारात बिबट्याने शेळीवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये शेळी जागीच मृत्युमुखी पडली मात्र शेळीवर हल्ला करत असताना शेतकरी शेळीला वाचवण्यासाठी गेला असता बिबट्या शेतकर्‍यावर धावून गेला मात्र इतर शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला त्यानंतर वन विभागाला याबाबत माहिती दिली त्यानुसार त्यांनी पंचनामा केला आहे
कारेगाव शिवारात बिबट्याने शेळीवर हल्ला केला कारेगाव येथील शेतकरी रावसाहेब सबाजी घुले आपली जनावरे चारत असताना यांच्या शेळीवर अचानक बिबट्याने हल्ला केला त्यात शेळीचा मृत्यू झाला शेळीवर बिबट्या हल्ला करत असताना शेतकऱ्यांनी शेळी वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र वाघाने थेट शेतकऱ्यावर हल्ला चढवला मात्र तिथे दोघे तिघे अजून असल्याने बिबट्याने तिथून पळ काढला शेतकऱ्यांनी तत्काळ पारनेर येतील वणाधिकाऱ्यांना कळवण्यात आले वनाधिकारी तेथे येऊन त्यांनी पंचनामा केला. 
सहा महिन्यापूर्वी गावात येऊन बिबट्याने शेळीवर हल्ला केला होता त्यावेळी गावांमध्ये वनविभागाने पिंजरा लावला होता आता पुन्हा बिबट्या या परिसरात वावरत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी व या परिसरामध्ये वन विभागाने त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी यावेळी सरपंच साहेबराव खरात ,उपसरपंच संदीप घुले, अंकुश पोखरकर ,लक्ष्मण घुले, ज्ञानेश्वर घुले, अजित घुले, संपत ठुबे,बाळशीराम घुले आदींनी केली आहे.