Breaking News

शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा, राष्ट्रवादीकडून गळचेपी !

 परभणी जिल्ह्यात महायुतीचेच उमेदवार ...

परभणी : राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.   त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा पाठवला आहे. त्यांनी राजीनाम्यासोबतच एक पत्रदेखील पाठवलं आहे. परभणीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत. राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत संजय जाधव यांनी पत्रात व्यथा मांडल्या आहेत.