Breaking News

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने शनिशिंगणापूर येथे आंदोलन !

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने शनिशिंगणापूर येथे आंदोलन !
--------
आघाडी सरकारचा मंदिर बंदचा निर्णय अन्यायकारकच
उद्धवा आता तरी दार उघडा-बाळासाहेब मुरकुटे


नेवासा/प्रतिनिधी : 
      राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी"दार उघड उद्धवा ...दार उघड अशा घोषणा देत टाळमृदुंगाचा गजर करत भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे आंदोलन केले.आघाडी सरकारचा मंदिर बंदचा निर्णय हा भाविकांच्या दृष्टीने अन्यायकारक असून"उद्धवा आता तरी दार उघडा"अशी हाक घालत बाळासाहेब मुरकुटे यांनी आपल्या भावना यावेळी बोलताना व्यक्त केल्या.
    माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व आध्यात्मिक समन्वय आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबनराव मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपचे नेवासा तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या नेतृत्वाखाली सोशल डिस्टनसिंगचे पालन करत मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे नेवासा तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी प्रास्ताविक केले यावेळी बोलताना ते म्हणाले की नेवासा तालुक्यात साठ ठिकाणी मंदिर प्रांगणाच्या बाहेर आंदोलन होत असून आघाडी सरकारने मद्यालयांना परवानगी दिली मात्र देवालयांना परवानगी दिली नसल्याने अनेक कीर्तनकार घरी बसून आहे तर देवालयांसमोर उपजीविका करणारे व्यावसायिक देखील अडचणीत आले त्यांची मोठ्या प्रमाणावर उपासमार होत आहे तीच परिस्थिती कीर्तनकारांच्या बाबतीत आहे. या कोरोनाच्या संकटात शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला असल्याचे सांगून आता तरी या तिघाडी सरकारला मंदिरे खुले करण्यासाठी जाग यावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
     भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की तीन तिघाडी काम बिघाडी असा कार्यक्रम आघाडी सरकारचा सुरू असून मंदिरे बंद असणे हा भाविकांवरील अन्यायच आहे,म्हणून भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्यावतीने हे आंदोलन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले,युवा मोर्चाचे विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक रुढीला अनुसरून हे आंदोलन राज्यभर होत असल्याचे सांगितले.
      महाराष्ट्रात लॉकडाऊन उठले असून देखील तीर्थक्षेत्रे व मंदिरे बंद आहे मंदिराचे दरवाजे या सरकारने खुले करावे, भजन प्रवचनाला परवानगी मिळावी म्हणून हे आंदोलन असून सरकारने याबाबत गांभीर्याने घ्यावे असे आवाहन केले.
     भाजप प्रणित आध्यत्मिक समन्वय आघाडीचे नगर जिल्हाध्यक्ष बबनराव मुठे म्हणाले की केंद्र सरकारने मंदिरे उघडण्याचे सांगितले मात्र याबाबत उद्धव सरकार आडमुठे पणाचे धोरण अवलंबविले आहे झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारने जागे व्हावे व भाविकांच्या श्रद्धेचा अंत न पहाता मंदिरे खुली करावीत असे आवाहन केले.
    यावेळी आध्यात्मिक आघाडीचे भिकचंद मुठे,जेष्ठ कार्यकर्ते बंडूभाऊ चंदेल,युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार,भिकचंद मुठे, प्रतापराजे चिंधे,शिवप्रसाद महाराज,पंडित,अभिषेक महाराज जाधव,अंबादास उंदरे,बाळासाहेब कु-हाट,कैलास दहातोंडे,नवनाथ गायकवाड,ऋषिकेश शेटे,रामदास सोनवणे,अरुण चांदगुडे,
अँड.स्वप्नील सोनवणे,विशाल धनगर,संजय गायकवाड,
भाऊसाहेब पोटफोडे,मनोज बोरुडे,लक्ष्मण बर्वे,विजय आव्हाड,पारस चोरडिया,शरद सोनवणे,शंकर ब-हाटे, सचिन मायवळे,दीपक सोनवणे उपस्थित होते.