Breaking News

बिबट्या ची मादी मृत अवस्थेत आढळल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ !

बिबट्या ची मादी मृत अवस्थेत आढळल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ !
----------
घातपात की विषबाधा चर्चेला उधाण !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
     कोपरगाव तालुक्यातील कुंभारी कोंबडवाडी शिवारातील राजेश मारुती कदम यांच्या शेती गट नंबर ९३ मध्ये दीड वर्ष वयाची मादी शनिवारी रात्री साडेआठ वाजता मृत अवस्थेत आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून घातपात की विषबाधा या चर्चेने जोर पकडला आहे.
   कुंभारी देर्डे कोर्होळे रोड वरील कोंबडवाडी शिवारातील राजेश कदम यांच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला त्यांनी ही बाब दत्ता चिने यांना सांगितली चिने यांनी कोपरगाव वन परिक्षेत्र अधिकारी यांना घटनेची माहिती दिली वन अधिकारी सांगळे आर एन , वनकर्मचारी जाधव डी एन, दवंंगे पी डी, थोरात एल एस, गोसावी एस एस, यांनी घटनास्थळी तात्काळ भेेेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा करत.
     मृत बिबट्याचे कोळपेवाडी पशुधन विकास दवाखान्यात  डॉ .कोळपे, यांनी शव विश्चेदन करत मृत बिबट्या वर कोळपेवाडी स्मशान भूमी मध्ये अग्निडाग देण्यात आला तालुक्यामध्ये बिबट्या चा वावर वाढलेला असून नागरिकांना बिबट्याचे दर्शन गोदावरी नदीच्या परिसरात वारंवार घडते या भागात रान डुकरे मुबलक पाणी उपलब्ध असल्याने उपासमारी मुळे बिबट्या मृत झाला नसावा असा ग्रामस्थांचा कयास असून विषबाधा की घातपात या चर्चेने जोर पकडला आहे. यावेळी दत्तात्रय कोळपे, राधाकृष्ण कोळपे ,ज्ञानेश्वर  उगले यांनी मदत केली.