Breaking News

विश्व वारकरी सेना कोपरगाव तालुका कार्याध्यक्ष पदी रविंद्र आगवण यांची नियुक्ती !

विश्व वारकरी सेना कोपरगाव तालुका कार्याध्यक्ष पदी रविंद्र आगवण यांची नियुक्ती !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतचे उपसरपंच रविंद्र शिवाजीराव आगवण यांची विश्व वारकरी सेना भारत संस्थापक अध्यक्ष तथा वरिष्ठ पदाधिकारी यांच्या संमतीने कोपरगाव तालुक्याच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
  रविंद्र आगवण यांनी करंजी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या माध्यमातून ग्रामविकासासाठी केलेले व करीत असलेले काम  विशेष उल्लेखनीय असुन त्यांचा सामाजिक ,धार्मिक ,कार्यात असलेला साहभाग लक्षात घेता त्यांच्या कडून निश्चितच राष्ट्र ,संत,देव,वारकरी सांप्रदाय व समाज हिताचे कार्य घडत राहील तालुक्यात वारकरी संप्रदायाच्या हितासाठी त्यांच्या माध्यमातून ते चांगले योगदान देऊन वारकरी संप्रदाय वाढविण्यासाठी व रक्षणासाठी त्यांना नियुक्ती पञ दिले असल्याची भावना भागवताचार्य रामायणाचार्य युवा किर्तनकार योगेश महाराज करंजीकर यांनी व्यक्त केली त्यांच्या निवडी बद्दल करंजी ग्रामस्थांसह तालुका वारकरी संघटना ,तालुक्यातील युवा किर्तनकार ,भजनी मंडळ,तालुका अध्यक्ष योगेश महाराज फापाळे करंजीकर,उपाध्यक्ष बाळासाहेब कुळधरण यांनी अभिनंदन केले