Breaking News

पारनेर तालुक्यात आज तीन कोरोना बाधित कोरोना बाधितांची संख्या चिंतेचा विषय !

पारनेर तालुक्यात आज तीन कोरोना बाधित कोरोना बाधितांची संख्या चिंतेचा विषय
पारनेर प्रतिनिधी- 
    पारनेर तालुक्यात दि. ३ रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जामगाव ५२ वर्षीय, म्हसने ४५ वर्षीय, पारनेर जेल मधील कैदी ३८ वर्षीय व्यक्ती असे शासकीय लॅबचे तीन अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
     तालुक्यात कोरोना वाढत असल्याने तालुक्याची चिंता वाढली आहे गेल्या तीन दिवसांत बाधितांची संख्या ७० पर्यत गेली आहे. रॅपिड किट च्या माध्यमातून केलेल्या चाचणीत मोठी संख्या समोर आली आहे. अजून यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सध्याच्या काळामध्ये कोरोना पासून दूर राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे अहवान तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे.
बाधित व्यक्ती आहे तो १०० मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असल्याचे आदेश ज्योती देवरे यांनी दिले आहेत.