Breaking News

कोपरगावात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त व्याख्यानमालेचे आयोजन !

कोपरगावात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त व्याख्यानमालेचे आयोजन !
करंजी प्रतिनिधी - 
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या आयुष्यात दु:ख दारिद्र् जवळून पाहिलेले असल्याने त्यांनी उपेक्षितांचे प्रश्नांला त्यांच्या लेखनातून वाचा फोडली असे प्रतिपादन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमीत्त कोपरगाव येथे आयोजित  व्याख्यानमालेच्या उदघाटनापर अध्यक्षीय भाषणात कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा व लेखिका सौ ऐश्वर्या संजय सातभाई यांनी व्यक्त केले.,
    कोपरगाव येथे आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे च्या जन्मशताब्दी निमित्त व्यख्यानमलेचे आयोजन करण्यात होते या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष व अध्यक्ष म्हणून सौ सातभाई उपस्थित होत्या.  या सम्मेलनास प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगावचे  माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,
ऍड. सुरेश मोकळ, दिनेश आरणे, दत्तू खैरणार हे  प्रमुख मान्यवर प्रशासनाचे सर्व नियम पाळत उपस्थित होते या वेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ सातभाई  म्हणाल्या की अण्णाभाऊंनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात गिरणी कामगारांचे प्रश्न आणि सयुक्त महाराष्ट्राची चळवळ अपल्या शाहिरीतून समाजापूढे मांडली त्यांनी लिहिलेल्या अनेक साहित्यातून मला हि उपेक्षित वर्गासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली त्यामुळे मी मला मिळालेल्या कोपरगाव नगराध्यक्ष पदाच्या कारकीर्दीत उपेक्षित घटकांचे प्रश्न सोडविण्यावर जास्त भर दिला तसेच अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळ्या संदर्भात शक्य तेवढे काम करतां आले.त्या शिवाय जेव्हा जेव्हा कोपरगांवला दलित साहित्य संमेलन झाले त्यात संमेलनाचे स्वागताध्यक्ष व कवि संमेलनाचे अध्यक्ष म्हणून  बोलवण्यात आले तेहवा मला लोकशाहीर अण्णाभाऊ यांचे जीवनावर बोलण्याच्या योग आला मिळाल्याने माझे जीवन धान्य झाले  असे  अध्यक्षीय भाषणात उदघाटन करताना सौ सातभाई यांनी मांडले .
 या वेळी त्यांनी आयोजन कमेटीला धन्यवाद देवून पुढील साहित्य प्रवासास शुभेच्छा दिल्या.या संमेलनातील
पाहूण्यांचा परिचय व प्रस्ताविक बाळासाहेब नेटके यांनी केले तर  आभार परशुराम साळवे यांनी मानले.