Breaking News

जिव्हेश्र्वर जयंती व स्वातंत्र्य दिनानिमित्त कोवीड योद्धा पुरस्काराचे वितरण, वीस जणांनी केले रक्तदान !

जिव्हेश्र्वर जयंती व स्वातंत्र्य दिनानिमित्त  कोवीड योद्धा पुरस्काराचे वितरण
वीस जणांनी केले रक्तदान 
नेवासा तालुका प्रतिनिधी :
जिव्हेश्र्वर जयंती व स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिव्हेश्र्वर भक्त सेवाभावी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर व केवीड योद्धा पुरस्काराचे वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
    मंडळाच्या अध्यक्षा मृणाल कनोरे यांनी प्रास्ताविक भाषणात मंडळाने यापुर्वी सामाजिक बांधिलकी म्हणून राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते जिव्हेश्र्वर प्रतिमेला पुष्पहार घालून रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. अष्टविनायक ब्लड बॅकेंच्या शिबीरात वीस सदस्यांनी रक्तदान केले. 
   मंडळाच्या अध्यक्षा मृणाल कनोरे यांच्या हस्ते कोरोना संसर्गाच्या स्थितीत शहरात व जिल्ह्यात उत्कृष्ट 
सेवा दिलेल्या प्रताप उर्फ प्रकाश मारवाडे व संजय मते यांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देवून केवीड योद्धा पुरस्कार देण्यात आला. यावेळी सचिव सुभाष पाठक, सोमनाथ खाडे व सदस्य उपस्थित होते.