Breaking News

अखिल वारकरी संघाच्या तालुका अध्यक्षपदी गणेश महाराज शेंडे !

अखिल वारकरी संघाच्या तालुका अध्यक्षपदी गणेश महाराज शेंडे !
निघोज प्रतिनिधी -
महाराष्ट्र राज्यअखिल वारकरी संघाची कार्यकारीणी नुकतीच जाहीर झाली . त्यात पारनेर तालुका अध्यक्षपदी गणेश महाराज शेंडे यांची निवड झाली .पारनेर तालुक्यातील प्रति पंढरपुर म्हणुन समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पिंपळनेर येथे  संत निळोबाराय वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक गणेश महाराज शेंडे आहेत . त्या शिक्षण संस्थेत  पाऊले , हरीपाठ , जागर, किर्तन , संगीत वाजवणे अशा प्रकारचे चांगल्या प्रकारे विद्यार्थी घडविण्याचे काम ते करतात . त्यातच त्यांची अखिल वारकरी संघाच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी निवड झाली त्यामुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे .