Breaking News

गृहमंत्र्यांचा महाराष्ट्रात ई पास च्या आवश्यकतेबाबत 'हा' मोठा खुलासा !

 अनिल देशमुख ने पतंजलि के खिलाफ ...

मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन केले होते. त्यांनतर विविध नियम बनविण्यात आले होते. महाराष्ट्रातही हे नियम लागू होते.

यातील महत्वाचे म्हणजे प्रवासासाठी आणि वाहतुकीसाठी ई पासचे आवश्यकता असणे. परंतु आता आंतरराज्य मालवाहतुकीसाठी कोणतीही बंधने असू नयेत, असे केंद्र सरकारने सर्व राज्यांना कळवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ई पास बाबत काय भूमिका असणार याकडे लक्ष लागले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात चर्चा करून पुढील निर्णय कळवला जाईल असे म्हटले होते. त्यांनी आता ट्विट करून राज्यात सध्या सुरु गाईडलाईन्स पुढील आदेशापर्यंत कायम राहतील, असे म्हटले आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार राज्यात सध्या असलेल्या गाईडलाईन्स पुढील आदेशापर्यंत कायम राहतील असे ते म्हणाले. दरम्यान, लस शोधण्यासाठी अनेक देशांत प्रयत्न सुरु आहेत.

भारताचा विचार केला तर भारतात तीन लशींचे उत्पादन प्रगतीपथावर आहे. यात 'सीरम इन्स्टिटयूट', 'झाइडसकॅडिला' आणि 'भारतबायोटेक' या तीन कंपन्यांकडून कोरोनाची लस तयार करण्याचे काम सुरू आहे.