Breaking News

कर्नाटक सरकारने छत्रपतीचा पुतळा हटवल्याप्रकरणी कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन !

कर्नाटक सरकारने छत्रपतीचा पुतळा हटवल्याप्रकरणी कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन
करंजी प्रतिनिधी-
 महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटक सरकारने रातोरात हटवल्याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चा च्या सकल मराठा समाज कोपरगाव च्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.
 या निवेदनावर बाळासाहेब आढाव, भरत मोरे,अनिल गायकवाड, अशोक आव्हाटे, दिनेश पवार व सुनील साळुंखे यांच्या सह्या असून या निवेदनाद्वारे मराठा क्रांती मोर्चा च्या सकल मराठा समाज कोपरगाव यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक कर्नाटक राज्यातील बेळगाव मधील मनगुत्ती गावात असलेले स्मारक सत्तेचा गैरवापर करून रातोरात हटवले तरी कर्नाटक सरकारने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सन्मान पूर्वक १५ दिवसाच्या आत उभारावे अन्यथा सकल मराठा समाज्याच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल आणि त्यातून जर काही कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकार ची असेल असे निवेदन कोपरगावचे तहसीलदार यांच्या मार्फत मा पंतप्रधान, मा मुख्यमंत्री, मा पोलिस निरीक्षक कोपरगाव शहर यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.