Breaking News

तालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. !

तालुक्यात २४ पॉझिटिव्ह, तर येळपणे येथील एका रुग्णाचा मृत्यू. !
  येळपणे/ प्रतिनिधी :- 
     श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण 24 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.दरम्यान श्रीगोंदा शहरात  6,हंगेवाडी 8, येळपणे 1,अजनुज 1,देवदैठण 2,पारगाव 1, मढेवडगाव 4,बेलवंडी 1 असे रुग्ण मिळून आले आहे. तालुक्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या ही 332 एवढी झाली असून 224 लोक बरे होऊन घरी गेले आहेत तर 108 लोकांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान कोरोनामुळे आज  येळपणे येथील एका 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे तालुक्यात आत्तापर्यत 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील  चौथा कोरोना बळी असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन खामकर  यांनी सांगितले.