Breaking News

स्थानिकांना टोल माफ व्हावा यासाठी नागरिकांचे आंदोलन !

स्थानिकांना टोल माफ व्हावा यासाठी नागरिकांचे आंदोलन !


खरवंडी कासार प्रतीनिधी :
        पाथर्डी:कल्याण- निर्मल-विशाखापट्टणम या ६१ राष्ट्रीय महामार्ग वरील तालुक्यातील बडेवाडी येथील चालू झालेला टोल बंद करा,अर्धवट असलेले रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे,स्थानिकला यातून वगळावे मगच टोल वसुली करा या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी खरवंडी गावाजवळ या महामार्गवर रास्तारोको आंदोलन कऱण्यात आले.जल क्रांती जन आंदोलनाचे प्रमुख दत्ता बडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. आम आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष किसन आव्हाड,बाबासाहेब वाघ,खरवंडी कासारचे माजी उपसरपंच राजेंद्र जगताप ,माही ती अधिकार जिल्हाअध्यक्ष शैंलेंद्र जायभाये, सामजिक कार्यकर्ते प्रकाश कटारीया,अमोल जायभाये,प्रदीप पाटील ,दीपक पाटील आदी उपस्थित होते.  यावेळी साई अर्बनचे अध्यक्ष सुनिल खेडकर यानीही टोल नाक्यापुढे उपोषण केले व स्थानिकांना टोल माफी व टोलनाक्यावर काम मिळाले पाहिजे , यावेळी उपोषणला असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
        आंदोलकांनी सुमारे तिन तास महामार्ग चक्का जाम केला होता.दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी आंदोलक ,महामार्गाचे प्रतिनिधी ,नायब तहसीलदार पंकज नेवसे यांची चर्चा घडून आली लेखी आश्वासन घेतल्या नंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र लेखी आश्वासनाची पुर्तता पंधरा दिवसात न झाल्यास उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा जलक्रांतीचे  अध्यक्ष दत्ता बडे यांनी दिला आहे .
      आंदोलना वेळी ऋगवाही केस रस्ता मोकळा करण्यास आंदोलकांनी सहकार्य करत माणुसकीचे दर्शन घडविले तर डॉ. संदिप कराड यांनी आंदोलकांना स्व खर्चाने मास्क वाटप केले.