Breaking News

भारतीय जनता पार्टी ओबीसीमोर्चा च्या जिल्हाध्यक्षपदी संतोष रायकर !

भारतीय जनता पार्टी ओबीसीमोर्चा च्या जिल्हाध्यक्षपदी संतोष रायकर
श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी - 
    अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीची नुकतीच जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली. त्यामध्ये पक्षाचे जिल्हाअध्यक्ष अरुण मुंढे यांनी हि नियुक्ती केली असुन श्रीगोंदा तालुका मधील भाजपचा युवा कार्यकर्ता म्हणुन संतोष रायकर यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
     भाजपाने प्रमाणिक काम करणाऱ्या कार्यकर्ते यांना संधी दिली आहे. संतोष रायकर यांनी २००० साली भाजपाचे काम चालू केले शाखाअध्यक्ष, तालुका युवाअध्यक्ष युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष तालुका संघटक, सरचिटणीस, भाजपचे विस्तारक पंचायत समितीची उमेदवारी असे तालुक्यात पक्षवाढी साठी माजी मंत्री आमदार बबनराव दादा पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. रायकर यांना कोणताही राजकीय वारसा नसताना पक्षाने जिल्ह्यात काम करण्याची संधी दिली आहे. सामान्य कार्यकर्ते च्या कामाची दखल पक्षाकडून घेतली जाते असे या निवडीतुन दिसते
निवडीनंतर बोलताना रायकर म्हणाले की पक्षाने दिलेली जबाबदारी ओबीसी व इतर लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचे आचार विचार लोकांपर्यत पोहचवण्यासाठी जिल्हाभर काम करणार असल्याचे तसेच माझ्या सारख्या तरुण कार्यकर्तेला दिलेल्या संधीचे सोनं करणार असल्याचे व जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या मार्गदर्शन व नेतृत्व खाली काम करणार असल्याचे संतोष रायकर यांनी सांगितले
या निवडी बददल माजी मंत्री पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, संघटनमंत्री किशोरजी कालकर, भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेशआण्णा टिळेकर, खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोंनिका राजळे, प्रदेश कार्यसमिती सदस्य प्रा .भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, माजी खा. दिलीप गांधी, मा आ शिवाजीराव कर्डीले, अभय आगरकर, सुनील रामदासी, वंसत लोढा, नामदेव राऊत, युवानेते विक्रमसिंह पाचपुते, प्रसादजी ढोकरीकर संतोष लगड .दिलीप भालसिंग, दत्तात्रय हिरनवाळे, श्यामराव पिंपळे, बाळासाहेब महाडिक आदी मान्यवरांनी रायकर यांचे अभिनंदन केले.