Breaking News

कोपरगांवचे तहसिलदार यांची उत्कृष्ट अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या कडून निवड !

कोपरगांवचे तहसिलदार यांची उत्कृष्ट अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या कडून निवड
करंजी प्रतिनिधी-
कोपरगांवचे तहसिलदार मा.श्री योगेशजी चंद्रे साहेब यांची उत्कृष्ट अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी मा.श्री. राहुलजी द्विवेदी साहेब (भा.प्र.से) यांनी निवड करुन सन्मानित केले आहे...
     आज जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे महसुल दिनाचे निमित्ताने कोपरगांवचे तहसिलदार मा.श्री योगेशजी चंद्रे साहेब यांच्या कार्याची  दखल घेत त्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अहमदनगर येते सन्मान करण्यात आला आहे.
      मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्याची धुरा सांभाळताना श्री चंद्रे यांनी लोकसभा - २०१९ विधानसभा - २०१९ या दोन्ही निवडणूक त्यांनी यशस्वीपणे हाताळल्या आहे.  त्याचबरोबर सन २०१९ रोजी गोदावरी नदीला आलेल्या महापुर या संकटात मोठ्या हिमतीने प्रशासनाच्या सर्व घटक आणि जनतेला सोबत घेवून मोठी कामगिरी केली आहे.अनुलोम अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील पाझर तलाव खोलीकरणचे सन १९७२ चे दुष्काळानंतर सर्वाधिक मोठे काम घेतले आणि यशस्वीपणे केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पिण्याचे आणि शेतीचे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठी मोलाची मदत झाली आहे. कोपरगांव शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणारा ५ नंबर तळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. कोरोना संकट काळात  सर्व विभागातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन  सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे कार्य अहोरात्र सुरु ठेवले आहे.सतत लोकांच्या प्रश्नासाठी मनापासून अहोरात्र झटणारे कोपरगाव चे तहसिलदार मा श्री योगेशजी चंद्रे साहेब यांच्या कार्याची दखल घेत उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव केला आहे त्यामुळे कोपरगाव च्या शिरपेचात एक मनाचा तुरा रोवला गेलं आहे कारण तहसीलदार श्री योगेश चंद्रे साहेब हे कोपरगाव तालुक्याचे रहिवाशी आहे.