Breaking News

जय हिंद विचार मंच कोपरगाव च्या वतीने क्रांती दिनी क्रांतीविरांना विनम्र अभिवादन !

जय हिंद विचार मंच कोपरगाव च्या वतीने क्रांती दिनी क्रांतीविरांना विनम्र अभिवादन !
 करंजी प्रतिनिधी-
       आज ९ ऑगस्ट संपूर्ण भारत देशात क्रांतिदिन म्हणून साजरा करून आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या ताब्यातून मोकळे करण्यासाठी सर्व प्रथम भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या शूर वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा या महान विरांची आठवण म्हणून ९ ऑगस्ट हा दिवस क्रांतिकारी दिन म्हणून संबंध भारत देशात साजरा केला जातो.
         कोपरगाव येथील जयहिंद विचार मंच चे संस्थापक अध्यक्ष किशोर चोरगे यांनी क्रांती दिनी क्रांतीविरांना अभिवादन करतांना म्हंटले आहे कि क्रांतीचा हेतु अत्याचारा विरूध्द त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देऊन जनतेला सुखी करण्याचा स्तुत्य उपक्रम असतो. भारतातील अनेक युवक क्रांतीविरांनी इंग्रजांची सत्ता उलथुन भारतमातेच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हाती शस्त्र घेतले त्यांचा लढा हा भारतातील सामान्य गोरगरीबांवर इंग्रजांकडून होणाऱ्या अत्याचारा विरूध्द होता तसेच त्यांचा लढा हा व्यक्तिगत नसुन देशासाठी न्यायासाठी होता . भारतात व्यापारासाठी  येणा-या  इंग्रजानी कपटाने भारतीय सत्तेची सुत्रे हाती घेतले यास या कार्तिकारकांचा अखंड विरोध होता. सन ११८५७ च्या युध्दा नंतर लाॅर्ड लिटन व सर रिचर्ड टेंपल याची जुलमी कारकीर्द भारतात सुरू झाली. हिदुस्थानातील संपत्ती परदेशात जाऊ लागली ,हिंदुस्थानी जनता कंगाल होऊ लागली बलाढ्य सत्ते पुढे काही चालेना म्हणुन अनेक जण उपासनेच्या मार्गाने स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न करू लागले तर काहीजण असहकार चळवळी उभारून प्रयत्न करू लागले. 
      काहींनी शस्त्र हा पर्याय निवडुन शस्त्र हाती घेतल्या शिवाय पर्याय नाही तसा स्वातंत्र्य सुर्य उगवणारच  नाही म्हणुन अनेक युवक क्रांतीकारी बनले हाती शस्त्र घेतले व जिवाची बाजी लावुन स्वतंत्र्य प्राप्तीचे प्रयत्न करत भारत मातेच्या सुटकेसाठी शाहिद झाले. देशासाठी न्यायासाठी प्राणाची चिंता न करता सशस्त्र क्रांती ने स्वांतत्र्य मिळवुन देणा-या हुतात्मा व क्रांतीकारींना आजच्या क्रांतीदिनी जयहिंद विचार मंच कोपरगा तर्फे विनम्र अभिवादन  करत आज युवकांनी अश्या क्रांतीविराचे विचार आत्मसाथ करत देशसेवेला स्वताला वाहुन घेत अखंड देशसेवेचा दिपस्तंभ तेवत ठेवण्याची गरज आहे असे अनोखे  विचार मांडत क्रांती दिनी क्रांतीविरांना  किशोर चोरगे यांनी अभिवादन केले आहे.