Breaking News

क्रांतिगुरु सोशल फाउंडेशन पदाधिकारी निवडी जाहीर.

क्रांतिगुरु सोशल फाउंडेशन पदाधिकारी निवडी जाहीर. 

कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
     कोपरगाव  तालुक्यातील  सामाजिक संघटना असलेल्या क्रांतिगुरू सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या. शिक्षक आघाडी प्रदेशाध्यक्षपदी गणेश कांबळे  यांची नियुक्ती करण्यात आली तसेच. शिक्षक आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी मच्छिंद्र सोळसे यांची नियुक्ती करण्यात आली.
     त्याचप्रमाणे संघटनेच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी दीपक  आरणे,अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष पदी सौ उज्वला आव्हाड,यांची नियुक्ती करण्यात आली.
      संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू कांबळे प्रदेशाध्यक्ष अंकुश  सोळसे, प्रदेश कार्याध्यक्ष विजय दोडके, प्रदेश सरचिटणीस सुदाम कांबळे, प्रदेश संघटक भागिनाथ कांबळे ,युवा प्रदेशाध्यक्ष सचिन भाऊ नेटारे, सल्लागार दिलीप सोळसे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा संचालक प्रमोद आदमाने रोहीदास पाखरे, लक्ष्मण रोकडे  ,शिवनाथ कांबळे,सिद्धार्थ खडांगळे,दादासाहेब काकडे, शंकर पाखरे,अमोल पगारे,महेश पंडोरे ,राजू ठोकळ ,नवनाथ बागुल ,रोहित घोरपडे,प्रसाद साळवे, मोसिन शेख, योगेश बर्डे क्रांतिगुरू सोशल फांऊडेशन शहरअध्यक्ष अनिल पगारे यांच्या सह अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या सहविचार सभेत सदर नियुक्त्या करण्यात आल्या. त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.