Breaking News

पारनेर तहसिलदारांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व प्रशासकीय कार्यालये बंद ठेवा : शरद पवळे

पारनेर तहसिलदारांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व प्रशासकीय कार्यालये बंद ठेवा-शरद पवळे


पारनेर प्रतिनिधी -
      थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट व जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांच्या विचाराने पारनेर तालुक्याला नवी दिशा मिळाली असुन पारनेर तालुक्याचे नाव देशात आग्रभागी उल्लेखले जावु लागले असुन पारनेर तालुक्याने अनेक देशहीतासाठी प्रेरणादायी चळवळी उभारुन यशस्वी करुन मोठ समाजहीत जोपासले असताना आज पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी खुर्चीचा मोह न ठेवता कोरोनासारख्या महामारीविरुद्ध प्रामाणिकपणे जिवाची पर्वा न करता रस्त्यावर येवुन नागरिकांची सुरक्षिततेची काळजी घेतली आहे अशा कर्तव्यदक्ष तहसिलदारांच्या गाडीवर वाळुचा ट्रक घालण्याचा केलेला प्रयत्न तालुक्याच्या प्रतिमेला,विचारांना सुन्न करणारा आहे तालुक्यासाठी योगदान देणार्‍यांच्या पाठीशी उभे राहणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे पारनेर तालुक्यात कोणाचीही गुंडगिरी खपवुन घेतली जाणार नाही सर्वसामान्य जनतेसाठी योगदान देणार्‍यांना जनता वार्‍यावर सोडणार नाही.
     पारनेर तालुक्यातील गुंडांवर अंकुश ठेवण्यासाठी तालुक्यातील गावांसह शहरांमधील सर्व कार्यालये बंद ठेवुन तहसिलदारांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ एकजुट दाखवुन अशा प्रकारचे धाडस कोणी करणार नाही जेणे करुन काही अघटीत घटना घडणार नाही याला सर्व अधिकारी क्षेत्रावर गांभिर्याने घ्यावे जेणे करुन सर्वसामान्य जनतेसाठी योगदान देणारे सुरक्षित राहतील जर आज आपण गप्प बसलो तर पुढील काळ आपल्याला माफ करणार नाही याची सुज्ञ नागरीकांनी नोंद घ्यावी असे मत सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी वृत्तपत्रीशी बोलताना व्यक्त केले.

पारनेर तालुक्यात रात्रीच्या अवैध्य धंद्यांना वरदहस्त - पवळे
       पोलिसांनी पारनेर तालुक्यात रात्रीचे पेट्रोलिंग वाढवुन वाळुसह अनेक बेकायदेशिर अवैध्यधंदे वाढायला लागलेले आहेत पारनेर तालुक्यात वाढणार्‍या गुंडगिरीने तालुक्याची प्रतिमा खराब होणार नाही व कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत.