Breaking News

माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
कर्जत / प्रतिनिधी
    कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आंदोलन केल्याप्रकरणी भाजपाचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३५ जणांविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर ते सोलापुर  महामार्गावर, माहिजळगाव चौक ता.कर्जत येथे राम शंकर शिंदे रा.चौंडी ता. जामखेड यांचे अध्यक्षतेखाली राज्य सरकारी शेतकऱ्याना दुधाला भाव वाढुन द्यावा या करीता माहिजळगाव 
या ठिकाणी आंदोलनाची कोणतीही परवानगी नसताना जिल्हाधिकारी यांच्याआदेशाचे उल्लंघन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर आदी ठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे उभे राहणे , थांबुन राहणे, रेंगाळणे व सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील.
असा आदेश असतानी ही भाजपा पक्षाचे कार्यकर्ते राम शंकर शिंदे रा. चौंडी, प्रसाद ढोकरीकर, कर्जत, अंगद ढोकरीकर, कर्जत, अशोक खेडकर, बहिरोबावाडी, बाळासाहेब देशमुख, कर्जत, राजेंद्र गायकवाड, माहीजळगाव, बाबासाहेब निंबाळकर, पाटेवाडी, प्रकाश शिंदे, चापडगाव, सुरेश भिसे, मलठण, भानुदास हाके, कर्जत, किशोर कोपनर, कर्जत, रावसाहेब कदम, माहीजळगाव, प्रकाश कदम, माहिजळगाव, मच्छिंद्र खेडकर, माहिजळगाव, सतिष शिंदे, चापडगाव, संतोष घोडके, माहिजळगाव, सतिष काळे, कर्जत, कल्याण जाधव, माहिजळगाव, पप्पु शिंदे, चापडगाव, बाळासाहेब भंडारी, पाटेगाव, आप्पा कदम, माहिजळगाव, राजेंद्र शिंदे, चापडगाव, रमेश व्हरकटे, व्हरकटवाडा, शरद जाधव, माहिजळगाव, बापु शिंदे, माहिजळगाव , नंदलाल काळदाते, चिंचोली काळदात, विजय भोसले, माहिजळगाव, अशोक शिंदे, चापडगाव व इतर
५ ते १० लोकांनी आज सकाळी साडेनऊ ते पावणे दहावाजेपर्यंत एकत्र जमून रस्ता अडवुन रस्त्याच्या मध्येभागी बसुन जाणाऱ्या येणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण करुन वाहतुक थांबवली. दुध ओतुन कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होईल याची जाणीव असताना भाजपाच्या या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द कर्जत पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि.कलम ३४१,१८८,२६९,२७० व भारतीय साथ रोग अधिनियम १८९७ चे कलम २,३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.