Breaking News

कोपरगाव मधील जनता कर्फ्यु दर रविवारी !

कोपरगाव मधील जनता कर्फ्यु दर रविवारी
करंजी प्रतिनिधी-
 कोपरगाव मधील वाढता कोरोना चा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता आठवड्यातून एक दिवस म्हणजे प्रत्येक शनिवारी संपूर्ण कोपरगाव शहर अत्यावश्यक सेवा सोडून बंद ठेवण्यात येत होते परंतु आता ९ ऑगस्ट पासून दर रविवारी शासनाचे पुढील आदेश येई पर्यंत जनता कर्फ्यु असेल असे कोपरगाव प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
 कोपरगांव शहरातील सर्व नागरिकांना, व्यावसायिकांना कळविण्यात येते की शहरात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोपरगांव शहरात सर्वसंमतीने दर शनिवारी जनता कर्फ्यु चे पालन करण्यात येत असून परंतु  पहिल्या व तिसऱ्या शनिवारी शहरातील बँका, एलआयसी इ. वित्तीय संस्था चालू असतात. बँकेच्या कामानिमित्त नागरिक घराबाहेर पडतात. त्यामुळे कोरोना विषाणू साखळी खंडित करणेकामी नागरिकांवर कारवाई करताना प्रशासनाला  अडचणी निर्माण होत होत्या त्यामुळे वाढती पेशंट संख्या आटोक्यात आणण्यासाठी विषाणू साखळी खंडित करणे गरजेचे असल्याने  शहरातील व्यापारी, सुज्ञ नागरिक  शनिवारी ऐवजी जनता कर्फ्यु वार बदलून रविवार करावा अशी मागणी करत होते. त्यामुळे वरील सर्व मुद्दे विचारात घेता यापुढे जनता कर्फ्यु वार रविवार असेल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी . 
      असे आव्हान कोपरगाव प्रशासनाच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलिस निरीक्षक शहर राकेश मानगांवकर यांनी दिलेल्या परिपत्रकाद्वारे वरील प्रमाणे होणारा बदल नागरिकांनी लक्षात घ्यावा.