Breaking News

येसगाव येथील महिला तलाठी लाचलुचपत च्या जाळ्यात !

येसगाव येथील महिला तलाठी लाचलुचपत च्या जाळ्यात !
करंजी प्रतिनिधी : 
     गेल्या  आठवड्यात तालुक्यातील कुंभारी गावातील तलाठी कार्यालयात कार्यरत असलेले तलाठी सुनील साबणे नाशिक विभागीय लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले असतांना आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी येसगाव तलाठी कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला तलाठी अवघ्या ८०० रुपयाची लाच घेताना नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडली आहे.            त्यामुळे  कोपरगाव तालुक्यातील अवघ्या दहा दिवसातील महसूल विभागाचे दोन तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात लाच स्वीकारतांना रंगेहाथ सापडल्याने कोपरगाव महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
   पुढील तपास नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.