Breaking News

जामखेड शहरासह तालुक्यात आणखी १६ जणांना कोरोनाची लागण

जामखेड शहरासह तालुक्यात आणखी १६ जणांना कोरोनाची लागण
 जामखेड प्रतिनिधी :
       जामखेड शहरासह तालुक्यात एकाच दिवशी १६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज दि ५ रोजी  ९५ जणांची रॅपिड अँटिजेन तपासणी करण्यात आली आहे. 
यामध्ये १६ कोरोना बाधित आढळले आहेत तर ७९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 
कोरोनाची लागण झालेले जामखेड शहरात ७,राजुरी ८ व 
साकत गावात १ असे एकुण१६ रुग्ण आढळून आले आहेत.
नागरिकांमधून जामखेड बंद की चालू ठेवावे याबाबत सोशलमिडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.