शिरापूर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण ! पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील शिरापुर येथून एका अल्पवयीन मुलीचे अज्ञ...
शिरापूर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण !
पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यातील शिरापुर येथून एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली आहे. याबाबत मुलीच्या आईने पारनेर पोलीस स्टेशन मध्ये अपहरणाची फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि ४ रोजी १ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घरासमोरून शिरापुर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथून मुलगी वय १७ वर्षे ०५ महिने घराच्या बाहेर गेली असताना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अज्ञात मोटरसायकलवरून पळून नेले आहे. अशी फिर्याद पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल डी. ए. उजगरे हे करत आहेत.