Breaking News

नेवासा पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा कोरोनाच्या महामारीत मृत्यु ! पोलिस दलात खळबळ !

नेवासा पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा कोरोनाच्या महामारीत मृत्यु ! पोलिस दलात खळबळ !
नेवासा तालुका प्रतिनिधी :
    नेवासा तालुक्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांचा आहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नेवासा येथील कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले होते.
  मात्र तीन,चार दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिक खालवल्याने या पोलिस कर्मचाऱ्याची रवानगी नगर येथिल    जिल्हा रुग्णालयात नंतर एका खासगी रुग्णालयात करण्यात आल्याची माहिती मिळते. मात्र दुर्देवाने सोमवार (दि.३) रोजी दुपारी या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे माहीती समोर आली आहे. या घटनेने नेवासा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली असून नेवासा तालूक्यातील ४० टक्के पोलिसांच्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत तर ६० टक्के पोलिसांच्या तपासण्या करण्यात आलेल्या नसल्यामुळे पोलिस दलात धाकधुक वाढली आहे.जनतेच्या रक्षणासाठी सद् रक्षणाय...खलनिग्रहणाय हे बिद्र घेवून जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा कोरोनाच्या महामारीत मृत्यु झाल्याने आता तरी ६० टक्के पोलिसांच्या कोरोना टेस्ट करण्यास गृहखाते धजावणार का? असा सवाल सुज्ञ नागरीकांतून व्यक्त केला जात आहे. इतर कर्मचारी टेस्ट करू घेण्यास इच्छुक असूनहि टेस्ट का केली जात नाही यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी पोलिस कर्मचाऱ्यांकडून होत आहे. 
  सोमवारी सायंकाळी तालूका आरोग्य विभागाला हाती आलेल्या आहवालात नेवासा शहरातील एक नव्या रुग्णांची वाढ झालेली आहे. २४९ रुग्णांपैकी १२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मयतांची नोंद ६ झाली आहे तर ११७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नेवासा पोलीस ठाण्यातील कोरोना बाधित आरोपी  येथील कारागृहात ठेवण्यात आलेले असून उद्या त्यांची रवानगी  दुसऱ्या तालुक्यात करण्यात येणार असल्याची माहिती नेवासा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी दिली आहे  

नेवासा येथील कोविड केंद्रात एक महिला आरोग्य अधिकारी कोरोना किट परिधान करुन कोरोना बाधीत रुग्णांवर औषधोपचार करत आसतांना सोमवार (दि.३) रोजी सायंकाळी त्यांनी हा ड्रेस परिधान केल्यामुळे त्यांना भोवळ येवून उपचार करणाऱ्या महिला अधिकारीच पडल्यामुळे आरोग्य विभाग या महिला वैद्यकिय अधिकाऱ्यांना उपचार करण्यात व्यस्त झाला होता. आता या महिला वैद्यकिय अधिकाऱ्यांची प्रकृती सुधारत आसल्याचे तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी यांनी दिली.