Breaking News

कोरोना संकटामुळे जेईई व नीट परिक्षा पुढे ढकलावी, एनएसयुआयची मागणी !

कोरोना संकटामुळे जेईई व नीट परिक्षा पुढे ढकलावी, एनएसयुआयची मागणी !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
    सध्या देशात व राज्यात कोरोनाचे संकट आहे. या संकटाचा मूकाबला करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अशातच केंद्र सरकारने ६ सप्टेंबर व १३ सप्टेंबर रोजी जेईई व नीट परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर परिक्षा पुढे ढकलावी अशी मागणी अहमदनगर एनएसयुआयच्या वतीने करण्यात आली आहे. 
महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे,जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक खांबेकर,युवक काँग्रेस जिल्हा महासचिव तुषार पोटे,काँग्रेस शहराध्यक्ष सुनील साळुंके यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तहसिल कार्यालय येथे विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी एन.एस.यु.आय कोपरगाव शहराध्यक्ष निरंजन कुडेकर,मंगेश देशमुख, सूनिल साळुंके,दत्ता भगिले आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे कि,  सध्या संपूर्ण जग कोरोना या वैश्विक संकटामुळे त्रस्त आहे.भारतात तर  हे संकट अधिकच भीषण बनले आहे.सद्यस्थितीत भारतात कोरोना संसर्गित लोकांची संख्या तीस लाखांहून अधिक झालेली आहे.अश्या परिस्थितीमध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी अत्यावश्यक असणार्‍या जेईई व नीट या परीक्षा ६ सप्टेंबर व  १३ सप्टेंबर रोजी घेण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे.सदर निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये अतिशय चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.एकप्रकारे या भीषण परिस्थितीत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात घालणे कितपत योग्य आहे असा सवाल एनएसयुआयच्या वतीने करण्यात आला आहे. 
सदर परिक्षा पुढे न ढकलल्यास एनएसयुआयच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.