Breaking News

प्रवरा नदीला पूर; छोट्या पुलावरून वाहतोय पाण्याचा प्रवाह पुल ओलांडताना दुचाकी पाण्यात वाहून गेली !संगमनेर/प्रतिनिधी :
निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे प्रवरा नदीला पूर आला आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे शहरातून संगमनेर खुर्दला जोडणार्या पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. परिणामी या मार्गाने ये जा करणार्या वाहन चालकांची आज पुरती तारांबळ उडालेली बघायला मिळाली. व्हिडीओ मध्ये दाखविल्याप्रमाणे एका दुचाकीस्वार पाण्यातून रस्ता काढण्याच्या नादात गाडीसह पाण्यात वाहून गेला. यावेळी इतर नागरिकांच्या मदतीने गाडी पुलाखाली पाण्यात वाहून जाण्यापासून वाचविण्यात दुचाकीस्वाराला कसेबसे यश आले.
संगमनेर नगरपरिषद आणि प्रशासानकाडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरीक अशा पद्धतीने जीव धोक्यात घालून पूल ओलांडताना दिसत आहे.