Breaking News

कोल्हार येथील पवित्र जल व माती आयोध्येला रवाना !

कोल्हार येथील पवित्र जल व माती आयोध्येला रवाना !
कोल्हार : (साईप्रसाद कुंभकर्ण ) :-
    देशभरातील किल्ले ,ऐतिहासिक स्थळे तसेच पवित्र तीर्थक्षेत्र  या ठिकाणांची पवित्र माती व पवित्र पाणी राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी आयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्ट ने मागवले आहे या पार्श्वभूमीवर आज रविवारी सकाळी येथील श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपुर येथील अमृतवाहिनी समजल्या जाणाऱ्या प्रवरा माईचे पवित्र जल व श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपुर येथील पवित्र मातीचे भगवती माता मंदिराच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजन करून कोल्हार भगवतीपुर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते , सेवा निवृत्त प्राचार्य शिवाजी उदावंत यांनी श्रीक्षेत्र देवगड येथे जाऊन ह भ प भास्कर गिरी महाराज यांच्याकडे प्रवरा माईचे पवित्र जल व श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपुर येथील पवित्र माती सुपूर्त केली.
या विधिवत पूजन कार्यक्रम प्रसंगी भगवती माता मंदिरात कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष सयाजी उर्फ भाऊसाहेब रघुनाथ खर्डे , कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे , कोल्हार बुद्रुकचे उपसरपंच ज्ञानेश्वर खर्डे भगवतीपुरचे सरपंच रावसाहेब कमळाजी खर्डे उपसरपंच अशोक दातीर ,देवालय ट्रस्ट चे ट्रस्टी राजेंद्र राऊत ,आनंद गुगळे ,उद्धव काळोखे ,विखे कारखान्याचे संचालक स्वप्नील निबे,शिवकुमार जंगम ,रंभाजी बोरुडे ,नवीन पटेल,बापू दळवी ,सोन्याबापू मोरे आदी पस्थित होते.
यावेळी बोलताना शिवाजी उदावंत म्हणाले की ,राम जन्मभूमि साठी आतापर्यंत अनेक वेळा संघर्ष झाला आहे .
1986साली राम मंदिर उभारणी साठी लढा सुरू झाला 19 89 साली संबंध देशभरातून शीला पूजना साठी  देशभरातून विटा पाठवण्यात आल्या होत्या त्या वेळेस कोल्हार भगवतीपुर व परिसरातील 42 खेडेगावातून विटा कोल्हार मध्ये आल्या होत्या कोल्हार मध्ये मोठा श्रीराम महायज्ञ
 झाला होता .
१९९० साली कोल्हार येथून कार सेवे साठी आयोध्येत कार सेवक गेले होते .न्यायालयीन लढाईत यश आल्यानंतर पाच तारखेला आयोध्येत श्रीराम मंदिर भूमिपूजन होत आहे असे सांगून त्यांनी पाच तारखेला कोल्हारच्या सर्व नागरिकांनी आपल्या घरासमोर सडा रांगोळी करावी ,गुढी उभारावी ,श्रीराम रक्षा वाचावी ,मारुती स्तोत्र वाचावे व दुपारी स्व्वा बारा वासता उत्तर दिशेला पुष्पवृष्टी करून रात्री घरो घरी दिवे लावावे असे आवाहन यावेळी उदावंत यांनी केले.