Breaking News

परशराम साबळे यांना सरपंच सेवा संघाचा शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार जाहीर !

परशराम साबळे यांना सरपंच सेवा संघाचा शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार जाहीर !


करंजी प्रतिनिधी- 
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र  जिल्हा अहमदनगर च्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेले ओम साई ग्रामीण शिक्षण संस्था कोपरगाव चे संस्थापक अध्यक्ष परशराम रामनाथ साबळे यांना देण्यात येणार आहे अशी माहिती सरपंच सेवा संघाचे संगमनेर राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे यांनी  परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
       संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या या सरपंच सेवा संघाचे राज्यभरात तब्बल २० हजार सरपंच सभासद आहे यांच्या माध्यमातून अहमदनगर सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना दरवर्षी सन्मानीत करण्यात येत असते. या वर्षी कोपरगांव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले ओम साई ग्रामिण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  परशराम रामनाथ साबळे  यांना या वर्षीचा शिक्षण क्षेत्रातील ते करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला. साबळे यांनी गरीब कुटूंबातून येऊन आपल्या हुशारी व कष्टाच्या जोरावर अल्पावधीतच   समाजात आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा  उमटवला आपल्या कामाची दिशा कर्तृत्व सिद्ध करून दाखवले  आज त्यांनी २००५ साली सुरू केलेल्या शिक्षण संस्थेत समाजातील सर्व स्तरातील ११ वी १२ वी ज्युनिअर , हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, बांधकाम सुपरवायझर, इंग्लिश मीडियम मुक्त विद्यालय या विभागातून हजारो विध्यार्थी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे आहे. तसेच साबळे यांना लोककलावंत सांस्कृतिक मंच मुबई यांचा २०१५ या वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव झालेला आहे. या एक ना अनेक शिक्षण क्षेत्रातील कामाची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे पुढील काही दिवसांत नामवंत मान्यवरांच्या शुभहस्ते साबळे यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती पावसे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
     सरपंच महासंघाच्या वतीने साबळे यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल कोपरगाव चे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,  संस्था सचिव सुचित्रा साबळे सातभाई कॉलेज प्रा विजय कापसे, साई शक्ती इंग्लिश मीडियम चे प्रा विजय जाधव, विलास चव्हाण, निलेश देवकर,सोनाली कापसे, रेखा दिवे आदींनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.