Breaking News

नगरपालिकेने उभारले गणपती विसर्जनासाठी मूर्ती संकलन केंद्र ! ! !

नगरपालिकेने उभारले गणपती विसर्जनासाठी मूर्ती संकलन केंद्र


करंजी प्रतिनिधी-
 कोरोनाचा वाढत्या पार्श्वभूमीवर गणेशविसर्जनाच्या वेळी गर्दी टाळण्यासाठी तसेच जलप्रदूषण होऊ नये यासाठी प्रशासनाने कोपरगाव शहरात विविध ठिकाणी बारा मूर्ती संकलन उभारण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
      या प्रसिद्धीपत्रकाद्वारे गोदावरी नदीत मूर्ती विसर्जनासाठी सक्त मनाई करण्यात आली असून त्या मुळे सर्व गणेश भक्तांनी श्री ची पूजा आरती आपल्या घरीच करून आपल्या गणरायाचे विसर्जन करण्यासाठी १ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत प्रशासनाने नेमून दिलेल्या ठिकाणी मूर्ती संकलन करावे मूर्ती सोबत निर्माल्य म्हणून एक फुल द्यावे बाकीचे हार फुले दुर्वा हे साहित्य आपल्या बगिच्यातील झाडांना खत म्हणून वापरावे.सर्व गणेश मूर्तीचे संकलन करून त्याचे विधिवत पणे कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने विसर्जन करण्यात येणार आहे.
      नगरपालिकेने लोढा मंगल कार्यालय,गोदावरी पेट्रोल पंपासमोर, साई बाबा तपोभूमी मंदिर,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोर, संत ज्ञानेश्वर व्यापारी संकुल, छत्रपती संभाजी महाराज सर्कल, आचारी हॉस्पिटल समोर,गोरोबनगर मंदिर, इंनडोअर गेम हॉल,माधव बाग, येवला नाका बेट नाका या ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असून नागरिकांनी आपल्या सोयी नुसार जवळच्या ठिकाणी गर्दी न करता श्री गणेश मूर्ती चे संकलन करण्यात यावे या वेळी प्रशासनाने कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भाव च्या अनुषंगाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे जे ने करून कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न उभा राहणार नाही असे आव्हान कोपरगाव चे नगराध्यक्ष विजय वाहडणे, उपनगराध्यक्ष योगेश बागुल, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे तसेच सर्व नगरसेवक व नागरसेविकानी कोपरगाव शहरातील गणेश भक्तांना केले आहे