Breaking News

जामखेड शाखेचे काम कौतुकास्पद :- राजु शेट्टी

जामखेड शाखेचे काम कौतुकास्पद  :- राजु शेट्टी

मा. खासदार राजु शेट्टी यांची जामखेडला सदिच्छा भेट !


जामखेड प्रतिनिधी :
     भूम येथील दूध दरवाढ मोर्चानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा मा.खासदार राजू शेट्टी यांनी नाशिक जिल्हा दौऱ्यावर जात असताना.
    जामखेड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
      तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी तालुक्यातील संघटनेचे चालेले यशस्वी कामकाज व पुढील वाटचाल या संबंधित चर्चा करून शेतकऱ्यांच्या  विविध अडचणी बद्दल  प्रश्नमांडले,तसेच  संघटनेच्या जामखेड कार्यालयाच्या  यशस्वी कामाचे कौतुक केले. 
      यावेळी तालुका संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, तालुकाध्यक्ष मंगेश आजबे,युवक तालुकाध्यक्ष अॅड.ऋषीकेश डुचे,खुरदैठणचे उपसरपंच बाळासाहेब ठाकरे, प्रा. राहुल पवार,स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील, गणेश खेत्रे, बाळासाहेब मुळे, गणेश परकाळे,बाबुराव साळुंखे, बाळू मुळे,मंगेश मुळे, संतोष जाधव आदींसह युवक,कार्यकर्ते उपस्थित होते.