Breaking News

दिलासादायक, नेवासा तालूक्यात मंगळवारी ६ कोरोनाबाधीत तर २० कोरोनामुक्त !

दिलासादायक, नेवासा तालूक्यात मंगळवारी ६ कोरोनाबाधीत तर २० कोरोनामुक्त ! 


नेवासा तालुका प्रतिनिधी :
    नेवासा तालूक्यात मंगळवार (दि.२५) रोजी कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव काही प्रमाणात रोखला गेला असल्याचे दिसून आले.मंगळवारी केवळ ०६ रुग्ण कोरोनाबाधीत आढळले आहेत तर २० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
   तालूक्यातील घोडेगांव येथे ०४, भेंडा खुर्द येथे ०१ तर भेंडा बुद्रूक येथे एकाचा समावेश आहे तालूक्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या ६३८ झाली असून त्यापैकी ४९२ कोरोनामुक्त झालेले आहेत तर १३२ कोरोनाबाधीतांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आत्तापर्यंत १४ रुग्ण मयत झाल्याचे यावेळी तालूका आरोग्य अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी माहीती देतांना सांगितले आहे.