Breaking News

जितेश सरडे यांच्या संकल्पनेतून साकारलेले राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर मतदार वेबसाईट नोंदणी.

जितेश सरडे यांच्या संकल्पनेतून साकारलेले राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर मतदार वेबसाईट नोंदणी.
---------
  ना.जयंत पाटील यांच्या हस्ते वेबसाईटचा मुंबई येथे शुभारंभ !
--------


पारनेर प्रतिनिधी-
     नुकत्याच येऊ घातलेल्या पश्चिम महाराष्ट्र व औरंगाबाद पदवीधर मतदार संघात येणाऱ्या काळात निवडणुका होणार असून,त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मतदार नोंदणी अभियानाला संपूर्ण राज्यभर सुरुवात केली आहे.
         राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष,सुनिल गव्हाणे व माहीती तंत्रज्ञान विभाग प्रमुख महाराष्ट्र राज्य,श्री.जितेश सरडे यांच्या संकल्पनेतून साकरलेल्या या नोंदणी वेबसाईटचे उदघाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांच्या हस्ते तसेच पश्चिम महाराष्ट्रतील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस युवा व विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाला.
           विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे व माहिती व तंत्रज्ञान युवा प्रमुख जितेश सरडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या वेबसाईटचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी भरभरून कौतुक करत येणाऱ्या निवडणूकीत अशाच जोमाने काम करा पक्ष संघटनेत यापुढे विद्यार्थी संघटनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अशा शब्दांत मार्गदर्शन केले.व पदाधिकाऱ्यांची एकजुटीने कार्यरत व्हावे मला विश्वास आहे की, आपण सर्व माझ्या विश्वासास नक्कीच पात्र ठरणार अशा पद्धतीने सर्वांचा आत्मविश्वास वाढवत कौतुकाची थाप दिली 
            पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन समाजकार्य व राजकारण करणाऱ्या या छोट्या गावातील मुलाच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना संधी देत, आमदार निलेश लंके यांनी एक चांगला मुलगा पक्षाला दिला आहे.असे उपस्थितीना सांगत जयंत पाटील यांनी जितेश सरडे यांचे कौतुक केले.
       या बैठकीस जलसंपदा मंत्री जयंत पाटील  मंत्री आदिती तटकरे,शिवाजी गर्जे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.