Breaking News

बाळासाहेब शिंदे यांनी अर्धाकिलो वजनाचा चांदीचा मुकुट खंडेश्वर मंदिरास अर्पण केला !

बाळासाहेब शिंदे यांनी अर्धाकिलो वजनाचा चांदीचा  मुकुट खंडेश्वर मंदिरास अर्पण केला !


प्रतिनिधी/येळपणे:- 
      श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील खंडेश्वर मंदिरासाठी बाळासाहेब शिंदे यांनी रविवारीअर्धा किलो चांदीचा  मुकुट गावकऱ्यांच्या ताब्यात अर्पण केला. प्रदीप काका एडके यांच्या हस्ते पूजा करून हा मुकुट ग्रामस्थांनी देवस्थानकडे सुपूर्द केला. तसेच ग्रामस्थांच्या वतीने शिंदे परिवाराचा सत्कार करण्यात आला. येळपणे येथील शिंदे परिवाराची खंडेश्वरावर श्रद्धा आहे .तसेच मंदिरातील जुना तांदळा दर्शनोयुक्त तयार व्हावा व त्यासाठी लागणारा खर्च ते देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल दादा वीर, कुकडी साखर संचालक आबा पाटील पवार, उपसरपंच गणेश पवार, सुनील नाना लोखंडे, सुभाष पवार,काशीनाथ धावडे, संजय पवार,संतोष डफळ, तुकाराम खामकर, आनंदा खामकर,तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.