Breaking News

पारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे

पारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे
----------
कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल 
-----------
एक दिवस आरोग्यासाठी एक दिवस लक्षणांसाठी एक दिवस तपासणीसाठी हा त्रिसूत्री कार्यक्रम !

पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या वाढली तरी हरकत नाही पण एकही मृत्यु होऊ नये हाच प्रयत्न !


पारनेर प्रतिनिधी -
      पारनेर शहरात सोशल डिस्टन्स व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन होत नसल्याने तसेच रुग्ण वेळेत आपल्या कोरोना चाचण्या करत नसल्याने उद्या पासून तीन दिवस फक्त पारनेर करांनी आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी द्यायचे आहेत एक दिवस आरोग्यासाठी एक दिवस लक्षणांसाठी एक दिवस तपासणीसाठी हा त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यासाठी पारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.
   या काळामध्ये ज्या नागरिकांना लक्षणे दिसत असेल त्यांनीही निसंकोचपणे आपली कोरोना चाचणी करून घ्यावी आपण पॉझिटिव्ह आलो म्हणजे आपल्यावर बदनामीची वेळ आली असे होत नसते तो जर भ्रम असेल तर तो प्रत्येकाने डोक्यातुन काढून टाकला पाहिजे .असा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या जीवाशी खेळत आहात हे लक्षात घ्या !
तुमचे आरोग्य हे खुप अनमोल आहे .तपासणी करून त्यावर उपचार सुरू केल्यास ती जागरूक नागरिक असल्याची भावना निर्माण करते.
उपचारांना विलंब झाल्यामुळे एक दिवस मृत्यूची बातमी येते मग ही बातमी चांगली की कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्वरित उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलात हे चांगले? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवा. याचा समाजातील नागरिकांनी विचार करायला हवा!
   कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले आहे.स्वत:च्या जीवाशी खेळ कराल तर कुटुंब  गणगोत मित्रपरिवार यांना दु:खाच्या खाईत लोटून जाल हे ध्यानात घ्या
तसेच त्यांनी स्वतः मीही त्यातून गेले आहे हे देखील सांगितले यावेळी त्या म्हणाल्या की माझ्या चाचण्या निगेटिव्ह येत होत्या तर मी पाच वेळा चाचणी केली कारण मला वाटत होते की मी संपर्कात आलेले आहे म्हणून मी चाचण्या केल्या त्यामध्ये मला कोणताही कमीपणा वाटला नाही जर मी  टेस्ट निगेटिव्ह आल्या म्हणून विषय सोडून दिला असता पण मला स्वतःलाही वाटत होते की मला लक्षणे आहेत.मी पॉझिटिव्ह आले तोपर्यंत मी उपचार  घेऊन तिन दिवस झालेले होते.त्यामुळे आपल्या स्वतःच्या शरीराकडे या काळात बारकाईने लक्ष दिले पाहिजे .आपले शरीर व मन आपल्याला बर्‍याच गोष्टी सांगत असते. आपल्या शरीराच्या ,मनाच्या आणि प्रशासनाच्या हाका बारकाईने ऐकाल तर होणारे मृत्यू अजुनही रोखु शकतो हा विश्वास बाळगा.खोट्या कल्पनांमध्ये अडकू नका बुरुजावरती झेंड्यासारखे फडकू नका.झेंडा फडकवायचा असेल तर आपल्या घरावरती मी कोरोना तपासणी करुन घेतली आहे असा फडकवा. असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे या तीन दिवसांमध्ये लक्षणे असतील तर आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्या ! पारनेर शहर हे उद्या पासून तीन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

स्वतःला त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्तींना तसेच शेजारी पाजारी लोकांना ताप येऊन हात पाय दुखणे, ताप येऊन डोकं दुखणे, ताप येणे,जुलाब होणे तोंडाची चव जाणे, वास न येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, सर्दी खोकला, या प्रकारची लक्षणे दिसतात त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी.