Breaking News

शिंगणापुरच्या पोलिस पाटील सविता आढाव " उत्कृष्ट पोलिस पाटील " पुरस्काराने सन्मानित !

शिंगणापुरच्या पोलिस पाटील सविता आढाव "  उत्कृष्ट पोलिस पाटील " पुरस्काराने सन्मानित !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
        शिंगणापूर, ता. कोपरगाव च्या पहिल्या महिला पोलीस पाटील सौ. सविता प्रशांत आढाव यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट पोलीस पाटील  पुरस्कार प्रदान करण्यात आला.
      सन २०१९-२०२० या मागील महसुली वर्षात शासनाने दिलेली कामे व जबाबदारी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकारी  राहुल  द्विवेदी यांच्या हस्ते  नुकतेच सौ. सविता प्रशांत  आढाव यांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. सौ. सविता आढाव यांच्या या निवडीबद्दल अतिरीक्त पोलीस अधीक्षक डॉ अंजली काळे , प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी वाकचौरे , तहसीलदार योगेश चंर्दे , पोलीस निरीक्षक राकेश मांनगावकर ,तालुका पोलिस स्टेशनचे अनिल  कटके , आदींनी अभिनंदन केले  आहे, तसेच कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या पहिल्या महिला आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी पोलीस पाटील सौ. आढाव यांना पत्र पाठवून अभिनंदन केले तसेच एक महिला म्हणून आपण काम करीत असल्याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.