Breaking News

केरळमध्ये पावसाचा हाहाकार; भूस्खलनात ११ मजूर ठार !

 केरळमध्ये पावसाचा हाहाकार; भूस्खलनात ११ मजूर ठार

केरळमध्ये पावसाचा हाहाकार ...
तिरुवनंतपूरम/ वृत्तसंस्था

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे केरळमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, शुक्रवारी मुन्नारमध्ये भूस्खलन झाले. त्यात चहाच्या मळ्यात काम करणारे ११ मजूर ठार झाले असून, इतर काही मजूर ढिगार्‍याखाली अडकले होते. या मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. पण पावसामुळे तेथील मदतकार्यात अडथळे येत होते.
केरळच्या अनेक भागांत गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी-नाल्यांना महापूर आले आहेत. या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी इडुक्की जिल्ह्यातील मुन्नार येथे भूस्खलन झाले. त्यात चहाच्या मळ्यात काम करणारे मजूर अडकले. या दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी मदतीसाठी एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी रवाना झाले होते, अशी माहिती मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिली.