Breaking News

पोलिसांनी चोरीचे सोने चोरीच्या 'भावात' लावले की काय, जावईशोधा'ची नेवाशात चर्चा !

पोलिसांनी चोरीचे सोने चोरीच्या 'भावात' लावले की काय ! सात तोळे सोन्याची अंदाजे किंमत लावली १ लाख ४० हजार रुपये ! किंमतीच्या 'जावईशोधा'ची नेवाशात चर्चा !


नेवासा तालुका प्रतिनिधी
नेवासा पोलिसांनी सात तोळे सोन्याची अंदाजे किंमत आजच्या घडीला केवळ ०१ लाख ४० हजार रुपये लावली असून आजच्या मितीला या सोन्याची अंदाजे किंमत साडेतीन लाख रुपये होत असून मोडीच्या भावातही या सात तोळे सोन्याची अंदाजे किंमत किमान २ लाख ५० हजार रुपये आजच्या बाजार भावाप्रमाणे होत आसतांना पोलिसांनी अंदाजे किंमत कशी लावली याचा 'जावईशोध' घेणे गरजेचे असल्याचे मतही काही जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
नेवासा येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयाजवळ राहणारे माजी प्राचार्य रघूनाथ आगळे यांच्या बंगल्यात चोरट्यांना प्रवेश करुन सात तोळे सोने बळजबरीने चोरुन चोरट्यांनी पोबारा केला ही घटना शुक्रवार (दि.२१) रोजी मध्यराञी दिड वाजेच्या सुमारास घडली.या घटनेत चोरट्यांनी आगळे दांम्पत्याला दमदाटी करुन जिवे ठार मारण्याची धमकी देवून धारदार हत्याराने जखमी केले.बळजबरीने सात तोळे सोने चोरट्यांनी पसार केले याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात कौशल्या रघूनाथ आगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भा.द.वि. कलम ३९५,३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढिल तपास साहय्यक पोलिस निरिक्षक विजय ठाकूर हे करत आहेत.
माञ आजच्या घडीला सात तोळे सोन्याची अंदाजे किंमत साडेतीन लाख रुपये असून पोलिसांनी मोडीच्या भावाची अंदाजे किंमत लावली तर ती २ लाख ५० हजाराच्यावर होवू शकते मग नेवासा पोलिसांनी १ लाख ४० हजार लावण्याचा 'जावईशोध' कसा लावला असा सवालही जाणकरांतून व्यक्त केला जात आहे.