Breaking News

रोहित पवारांनी केली युवकांनी भेट दिलेल्या पर्यावरणपुरक गणेश मूर्तीची स्थापना !

 Image may contain: one or more people and indoor

मुंबई : देशात आणि परदेशांत देखील मराठी बांधवांकडून उत्साहाने साजरा केला जाणारा गणेशोत्सव सुरु होत आहे. आज घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होत आहेत. प्रत्येक गणेशभक्त एकच प्रार्थना करत असेल ती म्हणजे या कोरोनाचा मुळासकट नाश व्हावा. यंदाच्या वर्षी गेले ५ महिने थैमान घातलेल्या या कोरोनाचे सावट गणेशोत्सवावर आहे. त्यामुळे १२८ वर्षांची परंपरा असणाऱ्या या गणेशोत्सवावर काहीशा मर्यादा आल्या असल्या तरी उत्साह मात्र कायम आहे.

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या घरी गणेशाची स्थापना केली आहे. त्यांच्या मतदार संघातील काही युवकांनी भेट दिलेल्या गणेश मूर्तीची त्यांनी पूजन केले. ही मूर्ती त्यांच्या मतदार संघातील शेतकऱ्याने बनवून दिली असून ती पर्यावरणपूरक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यांनी, ” शहरातील युवांनी भेट दिलेला, मतदारसंघातून आणलेला व शेतकऱ्याने बनवून दिलेल्या पर्यावरणपूरक गोमय गणपतीची घरी कुटुंबियांसमवेत पूजा केली व कोरोनाचं संकट निवारण कर आणि त्यासाठी कोरोना वॉरियर्स, त्यांचं कुटुंब व इतर सर्वांना बळ दे,” अशी प्रार्थना विघ्नहर्त्याला केल्याचे देखील सांगितले.


रोहित पवार यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बाप्पांच्या आगमनाने घराघरात आनंद. उत्साह. चैतन्याचे. भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. भक्तीमय वातावरणात साजरा होत असलेला यंदाचा गणेशोत्सव कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन साजरा होईल. श्रीगणरायांच्या आशिर्वादाने संपूर्ण महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल असा विश्वास व्यक्त करीत अजित पवार यांनी राज्यातील जनतेला श्रीगणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.दरम्यान राज्यावरील कोरोनाचे संकट दूर कर. महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त कर असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री गणपती बाप्पांना घातले आहे.