Breaking News

''त्यांना धरून चोपलं पाहिजे'' त्याशिवाय ते सुधारणार नाही; राज्यमंत्री बच्चू कडू आक्रमक !

  Bacchu Kadu Single Telephone Call Worked | Sarkarnama

अमरावती । बोगस बियाणांमुळे हाताशी आलेलं पीक गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा राज्यात सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले. पेरणी करुनही सोयाबीन उतरलेच नाही. परिणामी शेतकऱ्यांवर दुबारपेरणीची वेळ आली. त्यामुळे सोयाबीनची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला धारेवर धरलं. 'राज्यातील कृषी खातं झोपलयं का' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकार तात्काळ पंचनामे करून, शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई देईल.

सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करून त्वरित नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी दिलेत. शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघालं. आता पिकावर रोग पडत आहे. तसेच त्यांनी सरकारच्या महाबीजावर देखील संशय व्यक्त केला, त्यामुळे राज्यातील कृषी खात झोपलं आहे की काय? असा सवाल देखील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता बियाणं बोगस निघालं की कंपनीच्या मालकांना चोपले पाहिजे असेही बच्चू कडू म्हणाले.