मुंबई | राज्यातील मंदिरे बंद असल्याने पुजारी आणि मंदिराच्या आसपासचे व्यावसायिक नाराज आहेत. तसेच राजकीय नेत्यांकडून धार्मिक स्थळं उघडण्या...
मुंबई | राज्यातील मंदिरे बंद असल्याने पुजारी आणि मंदिराच्या आसपासचे व्यावसायिक नाराज आहेत. तसेच राजकीय नेत्यांकडून धार्मिक स्थळं उघडण्याबाबत मागणी होताना दिसून येत आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारतर्फे धार्मिक स्थळं उघडण्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. धार्मिक स्थळांबाबत लोक भावनिक असतात. त्यामुळे तिथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणार नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
जर काटेकोरपणे पालन केले तर धार्मिक स्थळं सुरू करण्यास कोणी विरोध करणार नाही. मात्र ईश्वर हा सर्वत्र आहे. त्यामुळे थोडी सबुरी बाळगू, वेळ लागला तरी हरकत नाही, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने निर्णय न घेतल्याने त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मंदिरे खुली केली जावीत असं आपलंही मत असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं होतं