Breaking News

अकोले तालुक्यात आज एकाच दिवशी आढळले १३ करोना रुग्ण !

अकोले तालुक्यात आज एकाच दिवशी आढळले  १३ करोना रुग्ण !
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यात आज एकाच दिवशी १३  रुग्ण आढळले 
अकोले शहरात  १० रुग्ण तर  मवेशी (धामनवन),सुगाव व उंचखडक  येथे प्रत्येकी एक  असे  १३ रुग्ण आढळले 
 पुणे जिल्ह्यातील चाकण येथे खाजगी  नोकरी  करत असलेला  २९ वर्षीय व्यक्ती मवेशी (धामणवन)येथे गावात आल्या नंतर पिझिटिव्ह पॉझिटिव्ह आढळला.
शहरातील सुभाष रोडवरील  काल बाधित आलेल्या रुग्णांच्या कुटूबातील ०३ तर संगमनेर येथे बाधित आढळलेल्या पोलिसांच्या कुटुंबातील ६ जणांना कोरोना झाला यासह शहरातील आंबेडकरनगर येथे एक, सुगाव खुर्द, उंचखडक येथे रुग्ण आढळला .
अहमदनगर  येथील शासकीय प्रयोगशाळेतील अहवालात अकोले शहरातील सुभाषरोड येथील ५५ वर्षीय  ५७ वर्षीय महिला व ०४ वर्षीय बालक तर एका पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात ५० वर्षीय ,२८ वर्षीय महीला ३३ वर्षीय पुरुष ०७ व ०६ वर्षीय लहान मुले व ४ वर्षिय मुलगी  व तालुक्यातील उंचखडक येथील ६० वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल पॅझिटीव्ह आला आहे.तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात शहरातील आंबेडकर नगर येथील ३५ वर्षीय तरुण तालुक्यातील सुगाव खुर्द येथील ४६ वर्षीय पुरुष व मवेशी (धामणवन ) येथील  २९ वर्षिय तरुण  ला कोरोनाची बाधा झाली आहे.
  तालुक्यात रुग्णांची एकुण संंख्या १४८झाली आहे त्यापैकी ८५ जण कोरोनामुक्त झाले ०३ मयत तर सद्या ६० रुग्णांवर उपचार सुरु आहे.
-----