Breaking News

पारनेर शहर दोन दिवस बंद कोरोना सुरक्षा समिती, अध्यक्ष व सर्व सदस्य नगरपंचायत यांचा निर्णय !

पारनेर शहर दोन दिवस बंद कोरोना सुरक्षा समिती अध्यक्ष व सर्व सदस्य नगरपंचायत याचा निर्णय !
-----------------
व्यापाऱ्यांना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पूर्वतयारी करण्यासाठी पारनेर दोन दिवस बंद
--------------
तहसीलदार, नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या पथकाने केली बाजारपेठेतील दुकानांची पाहणी.
--------------
अनेक दुकानात प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाचा फज्जा.
------------
प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले तरच दुकाने उघडून देणारा तहसीलदार.
पारनेर प्रतिनिधी - 
            पारनेर शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे व्यापारी बाजारपेठेतील किराणा दुकानदार व त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची ची लागण झाली आहे. त्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे व पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा वर्षा नगरे याच्यासह नगरसेवकांच्या पथकाने बाजारपेठेतील दुकानांमध्ये नियमावलीचे पालन केले जाते का याबाबत पाहणी केली. मात्र अनेक दुकानात प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नाही. त्यासाठी दोन दिवस त्याची पूर्व तयारी व्हावी म्हणून पारनेर बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश कोरोना दक्षता समिती नगरपंचायत व तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.
            दि. ५ व गुरुवार दि. ६ रोजी शहरातील सर्व दुकाने बंद राहतील अत्यावश्यक सेवा (हॉस्पिटल, औषध दुकाने) सुरू राहील दि. ७ पासून जिल्हाधिकारी यांच्या सूचनांचे पालन करून सकाळी ९ ते ५ या वेळेतच दुकाने सुरू राहतील असा निर्णय कोरोना सुरक्षा समिती अध्यक्ष व सर्व सदस्य नगरपंचायत यांच्यावतीने घेण्यात आला आहे.
         प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टन्स व इतर नियमावलीचे पालन पारनेर मधील व्यापारी बाजारपेठेमध्ये होत नाही त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी या बाजारपेठेत  मध्ये दुकानांची पाहणी केली त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी बाजारपेठेतील दुकाने बंद केली व्यापारी दुकानदार यांनी जर याची पूर्तता केली नाही तर दुकाने बंद ठेवावी लागतील असेही तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले आहे. ग्राहका बरोबरच दुकानदारांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण बाजार पेठेतील एका किराणा दुकानदाराला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांना त्याची लागण झाली. त्यामुळे यापुढील काळामध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्ती व एक पेक्षा जास्त मोटरसायकल जर दुकानासमोर दिसल्या तर ते दुकान पूर्वसूचना न देता एक महिन्यासाठी बंद करण्यात यईल सोशल डिस्टन्स काटेकोरपणे पालन करणे दुकानांमध्ये सॅनिटायझर ठेवणे त्याचा वापर करणे यासारख्या सर्व गोष्टी मान्य असतील तरच दुकान उघडण्यासाठी परवानगी देण्यात येईल असेही यावेळी त्यांनी सांगितले.
          यावेळी नगराध्यक्षा वर्षा नगरे, उपनगराध्यक्ष दत्तात्रय कुलट, माजी उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, चंद्रकांत चेडे, नंदकुमार देशमुख, मुदस्सर सय्यद, अर्जुन भालेकर, शंकर नगरे, नंदकुमार औटी, किसन गंधाडे, विजय वाघमारे, विशाल औटी, आनंदा औटी, नंदा देशमाने, उदय शेरकर, भरत औटी आदी उपस्थित होते.

    पारनेर शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे आजपर्यंत आलेल्या अहवालात शहरातील दहा व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी घेण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू आहेत या पुढे धोका होऊ नये म्हणून नगरपंचायत व तहसीलदार यांनी दुकानदारांना सूचना केल्या आहेत त्याची दोन दिवस पूर्वतयारी करण्यासाठी दुकाने बंद ठेवली आहे.