Breaking News

आमदार डॉ किरण लाहमटे यांच्या हस्ते भंडारदरा व निळवंडे धरणाचे जलपूजन संपन्न !

आमदार डॉ किरण लाहमटे यांच्या हस्ते भंडारदरा व निळवंडे धरणाचे जलपूजन  संपन्न      
   राजूर प्रतिनिधी  । 
     आज अकोले तालुक्यासह अर्ध्या अहमदनगर जिल्हाची तहान भागवणाऱ्या इथल्या शेती,उद्योगासाठी जिवनदायीनी ठरलेल्या भंडारदरा व निळवंडे धरणाचा जलपुजन सोहळा आज आमदार डाॅ.किरण लहामटे व अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष संदिप वर्पे व जेष्ठ नेते आशोकराव भांगरे यांच्या उपस्थित व हस्ते पार पडला.अकोले तालुक्याच्या विकासामध्ये निश्चितपणे भंडारदरा धरणाची मोठी कृपादृष्टी असुन या धरणामुळे अनेकांच्या जिवनात आर्थिक भरभराट झाली आहे.  
       भंडारदरा हे धरण हे अकोले तालुक्याचे भुषण असुन अकोलेकरांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे.अकोले तालुका पावसाळा सुरु झाला की चातका पक्षा प्रमाणे भंडारदरा धरण भरावे यासाठी मी मनोभावे वरुणराजाची प्रार्थना करत असतो.असे उदगार आमदार डॉ. किरण लाहमटे यांनी जलपूजन झल्यावर काढले. चोळी पातळ,श्रीफळ अशी विधीवत पूजा करुन आज भंडारदरा व निळवंडे धरणाचे जलपुजन करण्यात आले. यावेळी अकोले तालुक्यातील सर्व पदाधिकारी तसेच निळवंडे ,भंडारदरा, रणद,शेंडी येथील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.