अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या द्विशतकाच्या उंबरठ्यावर, इंदोरी गावात पती पत्नी कोरोना बाधित.! अकोले प्रतिनिधी : अकोले तालु...
अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या द्विशतकाच्या उंबरठ्यावर, इंदोरी गावात पती पत्नी कोरोना बाधित.!
अकोले प्रतिनिधी :
अकोले तालुक्यात सकाळी दोन करोना बाधित आढळल्या नंतर सायंकाळी पुन्हा ३ रुग्ण पॅाझिटीव्ह आढळले तर रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये ५ अशी दिवसभरात तालुक्यातील १० व्यक्ती कोरोना बाधित झाले आहे
काल इंदोरीत बाधित आढळलेल्या व्यक्तीच्या संपर्ककातील आणखी दोघे पती पत्नी चा आज सकाळी खाजगी लॅब मधील अहवाल पॉझिटिव्ह आला होता तर आज सायंकाळी पुन्हा नविन नवलेवाडीतील तिन व्यक्ती तर खानापुर कोविड सेंटर येथे ॲन्टीजन टेस्ट मध्ये पाच व्यक्तीचा कोरोना खाजगी प्रयोगशाळेतील अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
सकाळी इंदोरी फाट्याजवळील पति-पत्नी कोरोना बाधित आल्यानंतर सायंकाळी खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात नवलेवाडी येथील एका कॅालणीत एकाच कुटुंबातील ६३ व ३३ वर्षीय दोन महिला व ३४ वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
तर खानापुर कोविड सेंटर येथे आज घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये शहारतील शिवाजी चाैकातील ५० वर्षीय महिला,इंदोरी येथील २४ वर्षीय महीला, १६ वर्षीय तरुणी व निब्रळ येथील ४६ वर्षीय पुरुष,म्हाळादेवी येथील ८६ वर्षीय वृद्धाचा कोरोना टेस्ट पॅाझिटीव्ह आली आहे.अशी आज दिवसभरात एकुण १० व्यक्ती कोरोना बाधित आढळुन आले आहे. तालुक्यात कोरोना चा आलेख वाढतच असून बाधितांची संख्या द्विशतकाच्या उंबरठ्यावर गेलीआहे तालुक्यातील रुग्णांची एकुण संंख्या १७८ झाली आहे त्यापैकी १२० जण कोरोनामुक्त झाले तर ५५ व्यक्तीवर उपचार सुरु आहे तर आतापर्यत ०३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे
---------------